रात्री आठला घराबाहेर पडलेली 26 वर्षीय विवाहिता परतलीच नाही…

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लहान मुलीला घेऊन बाहेर जाऊन येते असे सांगून बाहेर पडलेली 26 वर्षीय विवाहिता घरी परतलीच नाही. कालपासून ती बेपत्ता असून, आज, 16 मार्चला या प्रकरणात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. ही घटना निमकवळा (ता. खामगाव) येथे घडली आहे. गजानन राजाराम जामधरे (34, रा. निमकवळा) यांनी …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः लहान मुलीला घेऊन बाहेर जाऊन येते असे सांगून बाहेर पडलेली 26 वर्षीय विवाहिता घरी परतलीच नाही. कालपासून ती बेपत्ता असून, आज, ­16 मार्चला या प्रकरणात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. ही घटना निमकवळा (ता. खामगाव) येथे घडली आहे.

गजानन राजाराम जामधरे (34, रा. निमकवळा) यांनी पोलिसांत पत्‍नी सौ. रेश्मा हरवल्याची तक्रार दिली आहे. 15 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास पत्नी सौ. रेश्मा लहान मुलीला घेऊन बाहेर जाऊन येते असे म्‍हणून घरातून बाहेर पडली. बराच वेळ झाला तरी परतली नाही. तिचा परिसरात व नातेवाईक व इतरत्र शोध घेतला पण मिळाली नाही, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास ना.पो.काँ. संदीप दाबेराव करत आहेत.