रात्री उशिरापर्यंत चालली छाननी… 13 हजार 108 उमेदवार तरले!; आता माघारीकडे लक्ष

बुलडाणा (संजय मोहिते) ः जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राप्त झालेल्या 13 हजार 277 उमेदवारांच्या 13 हजार 599 अर्जांची छाननी मिनी मॅरेथॉन शर्यतच ठरली! थर्टीफर्स्ट च्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री 10 वाजेपर्यंत चालली. मात्र याचे अंतिम चित्र आज 1 जानेवारीला संध्याकाळी स्पष्ट झाले. 23 ते 30 डिसेंम्बर दरम्यान 13 तहसीलमध्ये प्राप्त …
 

बुलडाणा (संजय मोहिते) ः जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राप्त झालेल्या 13 हजार 277 उमेदवारांच्या 13 हजार 599 अर्जांची छाननी मिनी मॅरेथॉन शर्यतच ठरली! थर्टीफर्स्ट च्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री 10 वाजेपर्यंत चालली. मात्र याचे अंतिम चित्र आज 1 जानेवारीला संध्याकाळी स्पष्ट झाले. 23 ते 30 डिसेंम्बर दरम्यान 13 तहसीलमध्ये प्राप्त या अर्जांची छाननी म्हणजे तहसीलदार व कर्मचार्‍यांसाठी एक अग्निपरीक्षा ठरली. जवळपास 12 तास चाललेल्या या दीर्घ प्रक्रिया अंती 169 उमेवारांचे 200 अर्ज बाद झाले. यामुळे छाननी अंती 13 हजार 108 उमेदवारांचे 13 हजार 399 अर्ज मंजूर झाले आहेत. बुलडाणा व चिखलीत प्रत्येकी 20, सिंदखेडराजा व मेहकरात प्रत्येकी 24, खामगावमध्ये 32, शेगावात 17, संग्रामपूरमध्ये 21, मोताळ्यात 10, देऊळगाव राजात 15, जळगाव जामोदमध्ये 9, मलकापूरमध्ये 8, नांदुरा तालुक्यात 7 अर्ज बाद झाले आहे.