रात्री कामावरून आला की करायचा मारहाण, प्‍लॉटसाठी पैसे आण म्‍हणून छळ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पत्नीचा छळ करणाऱ्या पतीविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगला पुंडलिक वानखेडे (40, रा. अंबड, जि. जालना, ह. मु. शांतीनिकेतन, सागवन, बुलडाणा) यांचे 1998 मध्ये अंबड येथील पुंडलिक किसन वानखेडे याच्यासोबत लग्न झाले होते. पुंडलिक हा अंबड येथील एका दुकानात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पत्‍नीचा छळ करणाऱ्या पतीविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगला पुंडलिक वानखेडे (40, रा. अंबड, जि. जालना, ह. मु. शांतीनिकेतन, सागवन, बुलडाणा) यांचे 1998 मध्ये अंबड येथील पुंडलिक किसन वानखेडे याच्यासोबत लग्न झाले होते. पुंडलिक हा अंबड येथील एका दुकानात कामाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो रात्री कामावरून परतल्यावर बायकोला नेहमी मारहाण करायचा. प्लॉट घेण्यासाठी बायकोला माहेरहून पैसे आणायला सांगायचा. नकार दिल्यास पुन्हा शारीरिक व मानसिक छळ करायचा.या छळाला कंटाळूनच मंगला वानखेडे या 20 ऑक्टोबर 2020 पासून माहेरी सागवन येथेच राहतात.आज मंगला वानखेडे यांनी पतीविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पुंडलिकविरोधात गुन्हा दाखल केला.