रात्री जनावरे बांधून गेले, सकाळी येऊन पाहतात सारीच गायब!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील गोठ्यात बांधलेली 7 जनावरे चोरीला गेली. ही घटना आज, 24 मार्चला सकाळी उघडकीस आली. दुधा -माळवंडी रोडवरील (ता. बुलडाणा) गोठ्यात जनावरे बांधलेली होती. याप्रकरणी विक्रम शेनुबा सोनुने (रा. दुधा, ता. बुलडाणा) या शेतकऱ्याने धाड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुधा -माळवंडी रोडवर विक्रम शेनुबा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतातील गोठ्यात बांधलेली 7 जनावरे चोरीला गेली. ही घटना आज, 24 मार्चला सकाळी उघडकीस आली. दुधा -माळवंडी रोडवरील (ता. बुलडाणा) गोठ्यात जनावरे बांधलेली होती. याप्रकरणी विक्रम शेनुबा सोनुने (रा. दुधा, ता. बुलडाणा) या शेतकऱ्याने धाड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

दुधा -माळवंडी रोडवर विक्रम शेनुबा सोनुने व त्यांच्या भावाचे शेत आहे. शेतातच दोन्ही भावंडांनी जनावरांसाठी गोठा बांधलेला आहे. गोठ्यात 7 जनावरे बांधलेली होती.आज सकाळी विक्रम सोनुने शेतात जनावरांचा चारा- पाणी करण्यासाठी गेले असता त्यांना गोठ्यात जनावरे दिसले नाहीत. चोरट्याने जनावरे वाहनात कोंबून चोरून नेली असावीत, असा त्यांना संशय आहे. 2 मोठे बैल, 3 वर्षे वयाचा 1 गोऱ्हा, 2 वर्ष वयाची 1 काळी वगार, तसेच विक्रम सोनुने यांच्या भावाचा 1 मोठा बैल, 3 वर्षे वयाचा 1 गोऱ्हा, 1 लाल रंगाची वासरी असे एकूण 7 जनावरे चोरीला गेले आहेत.