रात्री दाखल झाला डिझेलचा टँकर; बुलडाणा आगारातून एसटी बससेवा सुरळीत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दिवस डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटीच्या बुलडाणा आगारातून बसेसच्या अर्ध्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. काल, 4 एप्रिलला रात्री उशिरा अकोल्यावरून डिझेलचा टँकर आगारात दाखल झाल्याने आज, 5 एप्रिलला बससेवा सुरळीत झाली आणि प्रवाशांची गैरसोय थांबली. सलग दोन दिवस बँका बंद असल्याने तेल कंपन्यांना पैसे न मिळाल्याने बुलडाणा आगारातून डिझेलअभावी अर्ध्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  दोन दिवस डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटीच्‍या बुलडाणा आगारातून बसेसच्‍या अर्ध्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्‍या. काल, 4 एप्रिलला रात्री उशिरा अकोल्यावरून डिझेलचा टँकर आगारात दाखल झाल्याने आज, 5 एप्रिलला बससेवा सुरळीत झाली आणि प्रवाशांची गैरसोय थांबली. सलग दोन दिवस बँका बंद असल्याने तेल कंपन्यांना पैसे न मिळाल्याने बुलडाणा आगारातून डिझेलअभावी अर्ध्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दिवसाला 17 हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या एसटी बसेस काल 7 हजार कि.मी.च धावू शकल्या. यातही ही समस्या सोडवण्यासाठी व प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागू नये म्हणून आगार प्रमुख श्री. मोरे आणि एसटी वर्क शॉपमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्‍न केले. अत्यावश्यक गाड्यांसाठी दुसऱ्या गाड्यांमधील डिझेल काढून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्‍न केला.  सध्या बुलडाणा आगाराला रोज 3 हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. कोरोना संकटापूर्वी दिवसाला 6 हजार लिटर डिझेल