रात्री १० वाजलेले… ती रस्त्‍‍यावर चिमुकलीसह धावत होती… वाचा पोलिसांनी ‘काय’ केले…!; लोणार येथील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्रीचे १० वाजलेले, 25 वर्षांची ती आपल्या 2 वर्षीय चिमुकलीसह धावत होती…सुदैवाने पोलिसांना जागरूक नागरिकांनी ही बाब सांगितली. पोलिसांनी तातडीने तिच्याकडे धाव घेतली. आस्थेने विचारपूस केली. पोलीस ठाण्यात आणून चहा-बिस्किटे दिली… तेव्हा तिने ओळख दिली आणि कुठे जायचे हेही सांगितले… तेव्हा कुठे पोलिसांचा जीव भांड्यात पडला आणि तातडीने त्यांनी हालचाली …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रात्रीचे १० वाजलेले, 25 वर्षांची ती आपल्या 2 वर्षीय चिमुकलीसह धावत होती…सुदैवाने पोलिसांना जागरूक नागरिकांनी ही बाब सांगितली. पोलिसांनी तातडीने तिच्‍याकडे धाव घेतली. आस्‍थेने विचारपूस केली. पोलीस ठाण्यात आणून चहा-बिस्‍किटे दिली… तेव्‍हा तिने ओळख दिली आणि कुठे जायचे हेही सांगितले… तेव्‍हा कुठे पोलिसांचा जीव भांड्यात पडला आणि तातडीने त्‍यांनी हालचाली करत तिच्‍या मामाला बोलावून घेतले आणि त्‍यांच्‍या स्‍वाधीन केले. पोलिसांतील ही सहृदयता दिसून आली ती 20 फेब्रुवारीच्‍या रात्री.
सूत्रांनी सांगितले, की लोणी रस्‍त्‍यावर ही महिला चिमुकलीसह धावत होती. जागरूक नागरिक तानाजी मापारी, भारत राठोड, निखिल राठोड, श्री. शिंदे यांनी तातडीने ही बाब राहल सरदार यांना सांगितली. सरदार यांनी तातडीने पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र देशमुख यांनी गांभीर्य ओळखून तातडीने सहकारी पोलीस उपनिरिक्षक भारत बर्डे, चंद्रशेखर मुरडकर, नापोकाँ जगदीश सानप, पोकाँ तेजराव भोकरे, मपोकाँ सीमा उन्‍हाळे, चालक सुधाकर काळे यांना घटनास्‍थळी पाठवले. महिलेला थांबवून आस्‍थेने विचारपूस केली. मात्र ती केवळ रडत होती. काहीच सांगत नव्‍हती. अखेर तिला घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तिथे तिला चहा बिस्‍किट दिले. आस्‍थेवाईकपणे चौकशी केली. तेव्‍हा तिने गुंजखेड (ता. लोणार) येथील मामाच्‍या घरी जाण्यासाठी निघाल्याचे सांगितले. त्‍यानंतर पोलिसांनी तत्‍काळ गुंजखेडचे पोलीस पाटील आणि सरपंचांना व्‍हॉट्‌स ॲपवरून तिचा फोटो पाठवला व ओळख पटवली. मामाच्‍या स्‍वाधीन तिला करण्यात आले. पोलिसांनी वेळीच कर्तव्‍यदक्षता दाखवली म्‍हणून ही महिला सुरक्षितरित्‍या मामाकडे पोहोचू शकली.