रात्री 9 वाजता सूचली मोबाइल खरेदी… पोलिसांनी 3 गिऱ्हाईकांसह दुकानदाराविरुद्ध केला गुन्‍हा दाखल; सिंदखेड राजात कारवाई

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी लावलेल्या कडक निर्बंधांना न जुमानणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध जिल्हाभर कारवाईचा धडाका पोलिसांनी लावला आहे. बाहेरून शटर बंद असले तरी, आतमध्ये गिऱ्हाईकी सुरू असते. विशेष म्हणजे दुकानातील कर्मचारी, ग्राहकांनी ना मास्क लावलेला असतो, ना सुरक्षित अंतर ठेवलेले असते. त्यामुळे दंड वसुली केली जाते. दुकानदारांवर कारवाई होत असताना सिंदखेड राजामध्ये तीन …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी लावलेल्या कडक निर्बंधांना न जुमानणाऱ्या व्‍यावसायिकांविरुद्ध जिल्हाभर कारवाईचा धडाका पोलिसांनी लावला आहे. बाहेरून शटर बंद असले तरी, आतमध्ये गिऱ्हाईकी सुरू असते. विशेष म्‍हणजे दुकानातील कर्मचारी, ग्राहकांनी ना मास्‍क लावलेला असतो, ना सुरक्षित अंतर ठेवलेले असते. त्‍यामुळे दंड वसुली केली जाते. दुकानदारांवर कारवाई होत असताना सिंदखेड राजामध्ये तीन गिऱ्हाईकांविरुद्धही पोलिसांनी गुन्‍हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरिक्षक शैलेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की 4 मे रोजी पोलीस निरिक्षक जयवंत सातव यांच्‍यासह मी व पोलीस कर्मचारी अतुल उंबरकर शहरात पेट्रोलिंग करत रात्री 9 वाजता नटराज चौकात साई मोबाइल शॉपी उघडी होती. दुकानात 3 गिऱ्हाईकही होते. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्‍त तो दुकान उघडे ठेवून गिऱ्हाईकी करत होता. त्‍यावरून दुकानमालक  विठ्ठल भगवान जाधव (32, रा. नटराज चौक सिंदखेडराजा), गिऱ्हाईक अनंता जगननाथ शिंदे (32, रा. पळसखेड झाल्टा, ता. सिंदखेडराजा), एकनाथ यादव शिंदे (35, रा. पळसखेड झाल्टा), संदीप नारायण शिंदे (35, रा.पळसखेड झाल्टा) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. या कारवाई सिंदखेड राजात खळबळ उडाली आहे.