राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बदलाचा निर्णय लांबणीवर, निष्ठावंतांनी मांडले गार्‍हाणे; पाटील-शेळकेंत तू तू मैं मै!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यात आज, 8 फेब्रुवारीला पार पडलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात संघटनात्मक आढाव्यावर भर देण्यात आला. वादग्रस्त ठरलेला जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसून आले. याउप्परही निष्ठावंत गटाने बदलाची मागणी प्रांत अध्यक्षांकडे रेटल्याने व जुन्या व नव्या नेत्यांमध्ये झालेल्या जाहीर खडाजंगीमुळे पक्षातील विसंवाद चव्हाट्यावर आलाच! आज …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यात आज, 8 फेब्रुवारीला पार पडलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात संघटनात्मक आढाव्यावर भर देण्यात आला. वादग्रस्त ठरलेला जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसून आले. याउप्परही निष्ठावंत गटाने बदलाची मागणी प्रांत अध्यक्षांकडे रेटल्याने व जुन्या व नव्या नेत्यांमध्ये झालेल्या जाहीर खडाजंगीमुळे पक्षातील विसंवाद चव्हाट्यावर आलाच!


आज राष्ट्रवादी भवनात बुलडाणा, चिखली व मलकापूर मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. याशिवाय जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली, यात जाहीरपणे काही खळखळ व्यक्त झाली नसली तरी व्यक्तिगत पातळीवर खदखद व्यक्त झाली. किसान सभा आघाडीचे माजी अध्यक्ष विष्णूपंत पाटील यांना जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी करणारे निवेदन प्रेरणाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील यांना देण्यात आले. या निवेदनावर जिल्ह्यातील 215 पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी सरपंच यांच्या सह्या आहेत. या विषयावर नंतर चर्चा करणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले..
…अन् खडाजंगी!
दरम्यान, बैठकीपूर्वी निवेदन देण्यासाठी आलेले विष्णूपंत पाटील व बुलडाणा विधानसभाप्रमुख नरेश शेळके यांच्या तू तू मै मै झाली. शेळके यांनी तुम्ही इथे कसे, असा सवाल करून पक्ष विरोधी कारवाया करता, असे ते म्हणाले. यावर पाटील यांनी हा सवाल करण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला, असा सवाल करून शिवसेनेमधून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असा पलटवार केला.

निष्ठावंत गटातर्फे प्रदेशध्यक्षांना जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.