राष्ट्रवादी नेते, माजी जि.प.उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर कालवश!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर यांचे आज, ३१ जुलैला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंत्रीखेडेकर (ता. चिखली) या जन्म गावातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. सरपंच ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. चिखली बाजार समितीचे उपसभापतीही ते काही …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर यांचे आज, ३१ जुलैला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

अंत्रीखेडेकर (ता. चिखली) या जन्म गावातून त्‍यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. सरपंच ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा त्‍यांचा राजकीय प्रवास राहिला. चिखली बाजार समितीचे उपसभापतीही ते काही काळ होते. पक्षसंघटनेतही त्‍यांनी महत्वाची पदे भूषवली. आज त्यांची प्रकृती खालावल्याने चिखली येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान दुपारी १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते जिल्‍हा परिषद उपाध्यक्ष असताना पाणंदमुक्‍त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी त्‍यांनी करून घेतली होती. गावांना भेटी देत ग्रामीण विकासाला चालना दिली. त्‍यांच्‍या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.