राहत्‍या घरातच 40 वर्षीय व्‍यक्‍तीने घेतला गळफास!; भोटा येथील घटना

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राहत्या घरातच 40 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 27 फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास भोटा (ता. नांदुरा) येथे घडली. कैलास कडू घुळे (रा. भोटा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. प्रभाकर तुळशीराम घुळे (55, रा. भोटा) यांनी पोलिसांना कळविल्याने पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. कैलास घुळे यांनी घरातच टिनांना आधार देणाऱ्या लाकडाला दोरी …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राहत्‍या घरातच 40 वर्षीय व्‍यक्‍तीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना आज, 27 फेब्रुवारीला दुपारी दीडच्‍या सुमारास भोटा (ता. नांदुरा) येथे घडली.

कैलास कडू घुळे (रा. भोटा) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. प्रभाकर तुळशीराम घुळे (55, रा. भोटा) यांनी पोलिसांना कळविल्याने पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. कैलास घुळे यांनी घरातच टिनांना आधार देणाऱ्या लाकडाला दोरी बांधून गळफास घेतला आहे. या प्रकरणी जलंब पोलिसांनी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली असून, तपास पोलीस कर्मचारी श्री. इंगळे करत आहेत.