राहत्‍या घरात युवकाने घेतला गळफास, शेगाव तालुक्‍यातील घटना

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राहत्या घरी छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन 30 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना काल, 8 एप्रिलला सायंकाळी सातच्या सुमारास आंबोडा (ता. शेगाव) येथे घडली. गजानन समाधान बावस्कर असे या युवकाचे नाव आहे. नातेवाइकांनी घटनेची माहिती जलंब पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. गजाननचे काका प्रकाश बावस्कर यांनी या …
 

जलंब (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राहत्‍या घरी छताच्‍या हुकला दोरीने गळफास घेऊन 30 वर्षीय युवकाने आत्‍महत्‍या केली. ही घटना काल, 8 एप्रिलला सायंकाळी सातच्‍या सुमारास आंबोडा (ता. शेगाव) येथे घडली.

गजानन समाधान बावस्‍कर असे या युवकाचे नाव आहे. नातेवाइकांनी घटनेची माहिती जलंब पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. गजाननचे काका प्रकाश बावस्‍कर यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. त्‍याच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आले नाही.