राहेरी पूल बंद केल्याने व्यवसाय ठप्प; सिंदखेड राजा नगराध्यक्षांचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकार्‍यांकडे गार्‍हाणे!

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील नवीन नागपूर- मुंबई महामार्गावरील राहेरी पुलावरील जड वाहतूक बंद आहे. यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील व्यवसायांवर परिणाम झाला असून, हा पूल 2016 -17 मध्ये देखील बंद करण्यात आला होता. पुलाला वळण रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला कंत्राटही दिले होते. मात्र निधीअभावी वळण रस्ता होऊ …
 

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील नवीन नागपूर- मुंबई महामार्गावरील राहेरी पुलावरील जड वाहतूक बंद आहे. यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील व्यवसायांवर परिणाम झाला असून, हा पूल 2016 -17 मध्ये देखील बंद करण्यात आला होता. पुलाला वळण रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला कंत्राटही दिले होते. मात्र निधीअभावी वळण रस्ता होऊ शकला नाही. वळण रस्ता त्वरित झाल्यास व्यवसायिकांचे नुकसान कमी होईल व इंधनाची सुद्धा बचत होईल. त्यामुळे सरकारी पातळीवर पाठपुरावा करून वळण रस्ता सुरू करून द्यावा, अशी मागणी सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्यासह जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे केली आहे.
अन्यथा व्यावसायिक होतील बेरोजगार
या शंभर किलोमीटरमध्ये मेहकर- जालना मार्गावर हॉटेल, पेट्रोलपंप, टायर पंक्चर दुकान, भाजीपाला, किराणा दुकान आहेत. त्यांचे व्यवसाय सध्या ठप्प आहेत. त्यामुळे व्यावसायिक बेरोजगार होण्याची भीती आहे. पर्यायी मार्ग पन्नास किलोमीटर लांब आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाचा उपयोग होतो, असेही निवेदनात म्हटले आहे.

पर्यायी रस्ता लवकरात लवकर करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले असून, लवकरच पर्यायी मार्ग सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिले आहे.

सतीश तायडे, नगराध्यक्ष