रिचा अन्‌ अली होणार चित्रपट निर्माते!

अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल यांनी आता चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला असून, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती दोघे करत आहेत. पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दिग्दर्शन शुची तलाटी करणार आहेत. हिमालयातील १६ वर्षीय मुलगी आणि तिच्या आईची गोष्ट या चित्रपटात आहे. गर्ल्स विल बी गर्ल्स या …
 

अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल यांनी आता चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला असून, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती दोघे करत आहेत. पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दिग्दर्शन शुची तलाटी करणार आहेत. हिमालयातील १६ वर्षीय मुलगी आणि तिच्या आईची गोष्ट या चित्रपटात आहे. गर्ल्स विल बी गर्ल्स या चित्रपटाची संहिता बर्लिनेल स्क्रिप्ट स्टेशन २०२१ कडून मागवण्यात आली असून, ही लॅब जगभरातून फक्त १० संहितांची निवड करते. त्याचबरोबर हा एकमेव भारतीय चित्रपट असेल जो जेरुसलेम चित्रपट महोत्सवात सादर होईल हे विशेष. रिचा आणि शुची यांनी शिक्षण सुरू असताना डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं होतं.