रुग्णालयातून सुटी होताच त्याने गाठले थेट पोलीस ठाणे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार वनरक्षक गंभीर जखमी झाला होता. ही घटना 26 मार्चला रात्री पावणे आठच्या सुमारास बोथा घाटातील देवरी फाट्याजवळ घडली होती. आज, 31 मार्चला त्यांना रुग्णालयातून सुटी झाली. त्यानंतर त्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठून एसटी बसचालकाविरुद्ध तक्रार दिली. नितीन आत्माराम सिरसाट (40) (रा. भादोला, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार वनरक्षक गंभीर जखमी झाला होता. ही घटना 26 मार्चला रात्री पावणे आठच्या सुमारास  बोथा घाटातील देवरी फाट्याजवळ घडली होती. आज, 31 मार्चला त्‍यांना रुग्‍णालयातून सुटी झाली. त्‍यानंतर त्‍यांनी सरळ पोलीस ठाणे गाठून एसटी बसचालकाविरुद्ध तक्रार दिली.

नितीन आत्माराम सिरसाट (40) (रा. भादोला, ता. बुलडाणा) बोथा घाटातून भादोल्याकडे येत असताना देवरी फाट्याजवळ खामगाव आगाराच्या एसटी बसने त्यांना धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर त्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठत बस चालकाविरोधात तक्रार दिली आहे.     बुलडाणा- खामगाव बस (क्रमांक एमएच 40 एन 9488) खामगावकडे जात असताना देवरी फाट्याजवळ रस्त्यात उभ्या मजुरांच्या वाहनाला वाचवण्याचा  प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली होती. यात दुचाकीस्वार वनरक्षक नितीन आत्माराम सिरसाट गंभीर जखमी झाल्याने जागेवरच बेशुद्ध झाले होते. एसटीच्या चालक- वाहकाने खासगी वाहनातून त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सुटी झाल्यानंतर त्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होत बसचालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्यानेच अपघात झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी खामगाव आगाराच्या बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चालक कोण होता, याची माहिती आता पोलीस खामगाव आगारातून घेत आहेत.