रेकॉर्ड ब्रेक..!; एकाच दिवसात जिल्ह्यातून सहा जण झाले गायब!!; पाच तरुणींचा समावेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात महिला, तरुणी, तरुण, पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्यांचा शोध लावण्याचे प्रमाणही अगदीच बोटावर मोजण्याइतके आहे. केवळ मिसिंगची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पुढे तपासाच्या नावाने बोंब असते. या महिला, तरुणींचे पुढे काय होते, हेही गौडबंगाल आहे. काल, ११ जुलैला बेपत्ता होण्याच्या बाबतीतही जिल्ह्याचा रेकॉर्ड झालाय. तब्बल सहा जण …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात महिला, तरुणी, तरुण, पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्‍यांचा शोध लावण्याचे प्रमाणही अगदीच बोटावर मोजण्याइतके आहे. केवळ मिसिंगची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पुढे तपासाच्‍या नावाने बोंब असते. या महिला, तरुणींचे पुढे काय होते, हेही गौडबंगाल आहे. काल, ११ जुलैला बेपत्ता होण्याच्‍या बाबतीतही जिल्ह्याचा रेकॉर्ड झालाय. तब्‍बल सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.

बोराखेडी पोलीस ठाण्यात काबरखेड (ता. मोताळा) येथील २३ वर्षीय काजल लहू पवार ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तब्‍बल चार तरुणी बेपत्ता झाल्याच्या नोंदी काल झाल्या आहेत. यात बुलडाण्याच्‍या शिक्षक कॉलनीतील सोनल विनायक वैरागडे (१९), वॉर्ड क्रमांक २ भीमनगर येथील वर्षा सुरेंद्र पवार (२४), माळविहीर गिट्टी खदान येथील सौ. नीलम अनिल कोली (२२), जिजामाता कॉलेज परिसरातून माधुरी अजय तायडे (२१) या तरुणी गायब झाल्या आहेत. पळसखेड सपकाळ (ता. चिखली) येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानमधून ३५ वर्षीय प्रभु नरवाडे हा युवक निघून गेला आहे. तो हरवल्याची तक्रार अमडापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.रेकॉर्ड ब्रेक..!; एकाच दिवसात जिल्ह्यातून सहा जण झाले गायब!!; पाच तरुणींचा समावेश