रेती तस्‍करीचा बळी!; तरुणाच्‍या अंगावर गेले रेतीने भरलेले ट्रॅक्‍टर!!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेती तस्करीने आणखी एक बळी घेतला. रेतीने भरलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना वकाना (ता. संग्रामपूर) शिवारातील बेंबळा नदीपात्रात काल, 26 जूनला सकाळी ११.३० च्या सुमारा घडली. योगेश महादेव डांबरे (रा. निवाणा, संग्रामपूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेती भरून नेताना …
 
रेती तस्‍करीचा बळी!; तरुणाच्‍या अंगावर गेले रेतीने भरलेले ट्रॅक्‍टर!!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेती तस्‍करीने आणखी एक बळी घेतला. रेतीने भरलेला ट्रॅक्‍टर अंगावरून गेल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना वकाना (ता. संग्रामपूर) शिवारातील बेंबळा नदीपात्रात काल, 26 जूनला सकाळी ११.३० च्‍या सुमारा घडली.

योगेश महादेव डांबरे (रा. निवाणा, संग्रामपूर) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेती भरून नेताना चालकाचे ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटले. ते योगेशच्‍या अंगावरून गेले. शिकाऊ ड्रायव्हरने भरधाव निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी महादेव जगदेव डांबरे यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामगाव पोलिसांनी ट्रॅक्टर- ट्रॉली जप्‍त केली आहे. तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास बीट जमादार प्रमोद मुळे करत आहे. मृतकाच्या पश्चात आई, वडील, 1 लहान बहीण आहे.