रेती वाहतुकीच्‍या टिप्परने घेतला तरुणाचा बळी!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देऊळगाव मही येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर काल, १५ जुलैला दुपारी घडली. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीतून रेती घेऊन हा टिप्पर भरधाव निघाला होता. समाधान …
 
रेती वाहतुकीच्‍या टिप्परने घेतला तरुणाचा बळी!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार एकाचा उपचारा दरम्यान मृत्‍यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देऊळगाव मही येथील कृषी उत्पन्‍न बाजार समितीसमोर काल, १५ जुलैला दुपारी घडली. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीतून रेती घेऊन हा टिप्पर भरधाव निघाला होता.

समाधान निवृत्ती भागिले (३२, रा. टाकरखेड भागिले, ता. देऊळगाव राजा) असे मृतकाचे नाव असून, त्‍याच्‍यासोबतचा हर्षल दत्तात्रय भागिले (२५, रा. टाकरखेड भागिले) हा जखमी आहे. दोघे कामानिमित्ताने चिखलीला जात होते. मागून भरधाव आलेल्या रेतीच्या टिप्परने त्‍यांच्‍या दुचाकीला उडवले. यात समाधान भागिले गंभीर जखमी झाला होता. दोघांनाही उपचारासाठी प्रथम जालना आणि नंतर औरंगाबाद येथे हलवण्यात आले असता समाधानचा उपचारादरम्यान आज, १६ जुलैला सायंकाळी पाचच्‍या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी हर्षल भागिले याच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक नितीन भगवान शिंगणे याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ आकिल काझी करत आहेत. अपघात घडविणारे टिप्पर पोलिसांनी जप्‍त केले नसल्याचे समजते.