रेल्वेखाली कटून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली कटून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शेगाव- जलंब रेल्वेमार्गावर आज, २ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. एका मालगाडीच्या चालकाने रेल्वे रुळावर मृतदेह कटलेला असल्याची माहिती शेगाव रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकांना दिली. शेगाव रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे कटलेला असल्याने संध्याकाळपर्यंत ओळख …
 
रेल्वेखाली कटून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली कटून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शेगाव- जलंब रेल्वेमार्गावर आज, २ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

एका मालगाडीच्या चालकाने रेल्वे रुळावर मृतदेह कटलेला असल्याची माहिती शेगाव रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकांना दिली. शेगाव रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे कटलेला असल्याने संध्याकाळपर्यंत ओळख पटू शकली नाही. ही आत्महत्या आहे की घातपात याबद्दलचा तपास शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव आगडते करीत आहेत.