रेल्‍वे रोखायला निघालेल्‍या आंदोलकांना शेगावमध्ये घेतले ताब्‍यात!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवे शेतकरी कायदे मोदी सरकारने रद्द करावेत, शेतमालाला योग्य भाव द्यावा, वाढती महागाई कमी करा, शेतकरी आंदोलनात झालेली दडपशाही आणि गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी शेगावमध्ये अखिल भारतीय किसान सभेने 18 फेब्रुवारीला शेगावमध्ये रेल रोको आंदोलन आयोजित केले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कमुळे ते फसले. आंदोलकांना रेल्वेस्थानक …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नवे शेतकरी कायदे मोदी सरकारने रद्द करावेत, शेतमालाला योग्य भाव द्यावा, वाढती महागाई कमी करा, शेतकरी आंदोलनात झालेली दडपशाही आणि गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी शेगावमध्ये अखिल भारतीय किसान सभेने 18 फेब्रुवारीला शेगावमध्ये रेल रोको आंदोलन आयोजित केले होते. मात्र पोलिसांच्‍या सतर्कमुळे ते फसले. आंदोलकांना रेल्‍वेस्‍थानक परिसरातच शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

पहाटे 5  पासूनच शेगाव शहर, रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने  रेल्वेस्थानकावर बंदोबस्त तैनात केला होता. शिवाय पोलीस आंदोलकांच्‍या शोधात होते. दरम्यान दुपारी 12 च्‍या सुमारास काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणाबाजी करत मुख्य मार्गाने रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाले. यावेळी शहर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. आंदोलनात जितेंद्र चोपडे, वामनराव रायपुरे, विश्वरूप कवीश्वर, डॉ. यशवंत वानखडे, शेख इक्रोमोद्दीन, महेश वाकदकर, दयाराम मुंडे, फकीरा वानखडे, शे. अकबर, शे. महेबूब, शे. हुसेन, ओम मुंडोळे, शे. जावेद, सुरेश गायकवाड, मनोहर साठे, जीवनगीर गोसावी, संतोष सोनोने, वसंता चोपडे, सुरेश कराळे आदी सहभागी होते.