रेशनचे धान्य काळ्याबाजारात जाताना ग्रामस्‍थांनीच पकडले; रेशन दुकानदाराची चौकशी, बोरगाव वसू येथील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेशन दुकानातील गहू, तांदळाचे 14 कट्टे काळ्या बाजारात विकण्यासाठी नेले जात असताना गावकऱ्यांनी पकडले. त्यानंतर हा प्रकार दुकानदाराच्या संमतीनेच सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या समोर आले. यानंतर वाहनचालक पसार झाला तर नायब तहसीलदार श्री. वीर यांच्याकडून दुकानदाराची चौकशी करण्यात येत आहे. आज, 1 जून रोजी बोरगाव वसू (ता. चिखली) येथे हा खळबळजनक …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रेशन दुकानातील गहू, तांदळाचे 14 कट्टे काळ्या बाजारात विकण्यासाठी नेले जात असताना गावकऱ्यांनी पकडले. त्‍यानंतर हा प्रकार दुकानदाराच्‍या संमतीनेच सुरू असल्याचे ग्रामस्‍थांच्‍या समोर आले. यानंतर वाहनचालक पसार झाला तर नायब तहसीलदार श्री. वीर यांच्‍याकडून दुकानदाराची चौकशी करण्यात येत आहे. आज, 1 जून रोजी बोरगाव वसू (ता. चिखली) येथे हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

गजानन गायकवाड व अमोल माने शेतातून घरी येत असताना त्यांना छोट्या मालवाहू वाहनातून रेशनचे धान्य नेले जात असल्याचे दिसले. याबद्दल त्यांनी गाडी थांबवून पाहणी केली असता धान्य रेशनचे असल्याचे लक्षात आले. त्‍यांनी वाहन गावात आणले. तोपर्यंत ग्रामस्‍थही जमले. रेशन दुकानदाराला विचारणा केली असता दुकानदार व नागरिकांत बाचाबाची झाली. अमोल माने यांनी लगेच गाडीतील धान्य खाली काढण्यास सांगितले. धान्य उतरवल्यावर गाडीवाला पसार झाला. नागरिकांनी गाडीचे व्हिडीओ सुद्धा काढले. या प्रकाराची माहिती तहसीलदारांना मिळताच त्यांनी नायब तहसीलदार श्री. वीर यांना बोरगाव वसू येथे पाठवले. याप्रकरणी रेशन दुकानदाराची चौकशी करण्यात येत आहे.

पहा व्हिडिओ ः