रेशन दुकानदार दिव्यांगांना देईनात अंत्‍योदय योजनेचा लाभ; मोताळ्यात राष्ट्रवादीची तक्रार

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बऱ्याच गावांत दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ रेशन दुकानदार देत नाहीत. त्यांना ३५ किलो धान्य, स्वतंत्र रेशन कार्ड व इतर सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रामदास सपकाळ व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश नाईक यांच्यासह दिव्यांगांनी मोताळा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की संजय गांधी, श्रावण …
 
रेशन दुकानदार दिव्यांगांना देईनात अंत्‍योदय योजनेचा लाभ; मोताळ्यात राष्ट्रवादीची तक्रार

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बऱ्याच गावांत दिव्यांगांना अंत्‍योदय योजनेचा लाभ रेशन दुकानदार देत नाहीत. त्‍यांना ३५ किलो धान्य, स्वतंत्र रेशन कार्ड व इतर सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रामदास सपकाळ व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश नाईक यांच्‍यासह दिव्यांगांनी मोताळा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्‍हटले आहे, की संजय गांधी, श्रावण बाळ योजनेची बैठक तत्‍काळ घेण्यात यावी. दिव्‍यांग व्‍यक्‍तीसाठी उत्‍पन्‍नाची अट ५० हजारांपर्यंत शिथील करावी. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे मानधन दर महिन्याला वेळेवर द्यावे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर धरणे आंदोलन करू, असा इशाराहीनिवेदनात दिला आहे.