लई भारी… सांगून केली चोरी!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरी तशी चोर सांगून करत नाहीत. पण जळगाव जामोद तालुक्यातील एका घटनेत सांगून चोरी केल्याचा प्रकार समाेर आला आहे. अर्थात हा केवळ योगायोग आहे की खरंच त्यांनी आधी बोलून चोरी केली, हे अद्याप समोर यायचे आहे. पण दोघांविरुद्ध चोरीचा ठपका ठेवण्यात आला आणि तशी तक्रारही जळगाव जामोद पोलिसांत झाली …
 
लई भारी… सांगून केली चोरी!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चोरी तशी चोर सांगून करत नाहीत. पण जळगाव जामोद तालुक्‍यातील एका घटनेत सांगून चोरी केल्याचा प्रकार समाेर आला आहे. अर्थात हा केवळ योगायोग आहे की खरंच त्‍यांनी आधी बोलून चोरी केली, हे अद्याप समोर यायचे आहे. पण दोघांविरुद्ध चोरीचा ठपका ठेवण्यात आला आणि तशी तक्रारही जळगाव जामोद पोलिसांत झाली आहे.

झाले असे, की गोरेगाव हुरसाड येथील राजेंद्र वासुदेव हुरसाड शेतकरी आहेत. त्‍यांच्‍या घरासमोर नळ आहे. पाणी भरण्यासाठी त्‍यांनी टेक्स्मो कंपनीची 1 हाॅर्सपावरची मोटर चार महिन्‍यांपूर्वी 7800 रुपयांनी विकत आणली होती. 12 जूनला सायंकाळी 5 वाजता त्‍यांचे शेजारी मोहन गणेश हुरसाड यांच्‍यासमोर प्रविण श्रीकृष्ण पवार व करण दीपक अवचार यांनी गप्पा केल्या की, राजेंद्र हुरसाड यांची टेक्स्मो मोटर चोरून घेऊन जाऊ. त्यानंतर खरंच रात्री 9 वाजता ही मोटर चोरीला गेली. काल, 16 जूनला सकाळी 11 गावातीलच संदेश शेषराव पवार याने हुरसाड यांना सांगितले की तुमची मोटर 12 जूनला रात्री प्रविण पवार व करण अवचार यांनी चोरून नेली आहे. त्‍यामुळे हुरसाड यांनी तातडीने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत.