लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला पळवले!; रायपूर पोलिसांत गुन्हा दाखल

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नाचे आमिष दाखवून पिंपळगाव सराई येथील अल्पवयीन मुलीला युवकाने पळवून नेले आहे. मुलीच्या आईने रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे. 17 वर्षीय मुलगी 9 जानेवारीला सकाळी शाळेत जाते म्हणून घरून गेली. ती परतलीच नाही. तिला गावातीलच आकाश गजानन पळसकर याने लग्नाचे आमिष …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नाचे आमिष दाखवून पिंपळगाव सराई येथील अल्पवयीन मुलीला युवकाने पळवून नेले आहे. मुलीच्या आईने रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे. 17 वर्षीय मुलगी 9 जानेवारीला सकाळी शाळेत जाते म्हणून घरून गेली. ती परतलीच नाही. तिला गावातीलच आकाश गजानन पळसकर याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत केली. तपास सहायक पोलीस निरिक्षक सुभाष दुधाळ करत आहेत.