लग्‍नाचे आमिष दाखवून अडीच वर्षे तरुणीवर लैंगिक अत्‍याचार, संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नाचे आमिष दाखवून अडीच वर्षे 22 वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना आलेवाडी (ता. संग्रामपूर) येथे आज समोर आली आहे. या प्रकरणी पीडित युवतीने आई-वडिलांसह सोनाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. अत्याचार करणाऱ्याला त्याच्या कुटुंबियांचीही साथ असल्याचा आरोप पीडितेने केल्याने पोलिसांनी युवकासह तिघांविरुद्ध …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍नाचे आमिष दाखवून अडीच वर्षे 22 वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार करण्यात आल्याची घटना आलेवाडी (ता. संग्रामपूर) येथे आज समोर आली आहे. या प्रकरणी पीडित युवतीने आई-वडिलांसह सोनाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. अत्‍याचार करणाऱ्याला त्‍याच्‍या कुटुंबियांचीही साथ असल्‍याचा आरोप पीडितेने केल्याने पोलिसांनी युवकासह तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

आदिल अब्‍बास सुरत्‍ने, अबुजर अब्बास सुरत्‍ने, आबिद अब्बास सुरत्‍ने अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तिघेही आलेवाडीचेच आहेत. पीडित युवती आई-वडिलांसह राहते. आदिलचे तिच्‍या घरी नेहमी येणे जाणे होते. 2017 पासून त्‍याने मला तुझ्याशी लग्‍न करायचे आहे असे म्‍हणून शारीरिक संबंध प्रस्‍थापित करायला सुरुवात केली. त्‍याला अबुजर आणि आबिद यांनीही सहकार्य केले. 29 जुलै 2019 रोजी आदिलने तिला त्‍याच्‍या घरी ठेवून घेतले होते. त्‍यावेळी सुद्धा त्‍याने तिच्‍यासोबत शारीरिक संबंध प्रस्‍थापित केले. ही बाब तिच्‍या घरी माहित पडल्‍याने तिच्‍या वडिलांनी तक्रार देण्यासाठी तिला घेऊन सोनाळा पोलीस ठाण्यात गाठले. मात्र गावातील प्रतिष्ठित व्‍यक्‍तींनी मध्यस्‍थी करत आदिलसोबत लग्‍न लावून देतो, असे सांगितले आणि पोलीस तक्रार करण्यापासून परावृत्त केले. तसा आपसी करारनामाही 30 जुलै 2019 रोजी आदिलने करून दिला होता. मात्र आदिल 2 जानेवारीला लग्‍नाकरिता हजर झाला नाही. त्‍याच दिवशी पीडितेच्‍या वडिलांनी सोनाळा पोलिसांत तक्रार केली होती. आदिलला त्‍याच्‍या वडिलांनी कोठेतरी लपवून ठेवले आहे. त्‍याच्‍या कुटुंबाकडे वारंवार चौकशी करूनसुद्धा त्‍याच्‍या कुटुंबियांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली. आदिलने माझे लैंगिक शोषण केले. त्‍याच्‍या कुटुंबियांनी त्‍याला साथ दिली, अशी तक्रार पीडितेने केली आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक अमर चोरे करत आहेत.