लग्‍नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. लग्नाबद्दल विचारणा केली असता युवती आणि तिच्या आईला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून 30 वर्षीय युवकासह 5 जणांविरुद्ध आज, 1 एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. सागर प्रकाश वैराळकर (30, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्‍याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. लग्‍नाबद्दल विचारणा केली असता युवती आणि तिच्‍या आईला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी युवतीच्‍या तक्रारीवरून 30 वर्षीय युवकासह 5 जणांविरुद्ध आज, 1 एप्रिलला गुन्‍हा दाखल केला आहे.

सागर प्रकाश वैराळकर (30, रा. गणेशनगर, बुलडाणा) या युवकाचे नाव आहे. सागरने यशोदानगरातील 23 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. 7 नोव्हेंबर 2020 ते 20 मार्च 2021 या कालावधीत तिच्याशी बुलडाणा, भुसावळ ,अकोला अशा विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. युवतीने लग्‍नाबाबत विचारणा केली असता तुझे दुसरीकडे दिल्लीवाल्या बिलालसोबत चालू आहे, असे म्‍हणून त्‍याने नकार दिला. मुलीच्या आई आणि भावाला लाथा बुक्‍क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्‍यामुळे युवतीने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून सागरसह त्याचे वडील प्रकाश वैराळकर, स्वप्नील प्रकाश वैराळकर, सौरभ पाटील, सुदा वैराळकर (सर्व रा. गणेशनगर, बुलडाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.