लग्‍नाच्‍या हट्टाला इतका पेटला की तिचे जगणे अवघड केले…; अखेर तिने पोलिसांत घेतली धाव; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरात एकटी असल्याचे पाहून 23 वर्षीय तरुणीला लग्नाचा हट्ट करून तरुणाने विनयभंग केला. माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझे फोटो व्हायरल करून बदनामी करेन, अशी धमकी या तरुणाने तिला दिली. या प्रकरणी काल, 13 मार्चला वरखेड बुद्रूक (ता. शेगाव) येथील तरुणीने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ओंकार हरिभाऊ …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः घरात एकटी असल्याचे पाहून 23 वर्षीय तरुणीला लग्‍नाचा हट्ट करून तरुणाने विनयभंग केला. माझ्यासोबत लग्‍न कर अन्यथा तुझे फोटो व्‍हायरल करून बदनामी करेन, अशी धमकी या तरुणाने तिला दिली. या प्रकरणी काल, 13 मार्चला वरखेड बुद्रूक (ता. शेगाव) येथील तरुणीने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी ओंकार हरिभाऊ अंभोररे (रा. बेलुरा, ता. पातूर, जि. अकोला) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

तरुणीने तक्रार दिली, की ओंकारचे वडील आणि तिचे वडील ओळखीचे असल्याने त्‍याचे घरी येणेजाणे होते. 4 फेब्रुवारीला ती घरात एकटी असताना ओंकार आला. त्‍याने तिला लग्‍नाचा हट्ट करत विनयभंग केला. तिने त्‍याच्‍या हाताला झटका देऊन बाहेर पळ काढला. त्‍यानंतर ओंकार तिथून निघून गेला. त्‍यानंतर 12 मार्चपर्यंत त्‍याने तिला वेळोवेळी कॉल करून लग्‍नाचा हट्ट धरला. दुसरीकडे लग्‍न होऊ देणार नाही. तुझे फोटो व्‍हायरल करेन. जीवे मारून टाकेन, अशा धमक्या दिल्या. या तक्रारीवरून पोलिसांनी ओंकारविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. तपास पीएसआय नीलेश डाबेराव करत आहेत.