लग्‍नाच्‍या ३१ व्या दिवशी कपाट साफ करत होती अन्‌ अक्षरशः ती हादरून गेली!; पतीची ती होती तिसरी बायको!!; खामगाव शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : थाटामाटात लग्न लागलं. ती सासरी आली… लग्नाच्या ३१ व्या दिवशी तिला घरातील कपाटात एक पत्रिका सापडली… अन् वाचून ती अक्षरशः हादरली…! त्याचे हे चक्क तिसरे लग्न होते… ती थेट माहेरी निघून आली आणि काल, २४ सप्टेंबरला खामगाव शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. …
 
लग्‍नाच्‍या ३१ व्या दिवशी कपाट साफ करत होती अन्‌ अक्षरशः ती हादरून गेली!; पतीची ती होती तिसरी बायको!!; खामगाव शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : थाटामाटात लग्‍न लागलं. ती सासरी आली… लग्‍नाच्‍या ३१ व्या दिवशी तिला घरातील कपाटात एक पत्रिका सापडली… अन्‌ वाचून ती अक्षरशः हादरली…! त्‍याचे हे चक्‍क तिसरे लग्‍न होते… ती थेट माहेरी निघून आली आणि काल, २४ सप्‍टेंबरला खामगाव शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

दीपाली सुनील पवार (२९, रा. बाळापूर फैल, खामगाव) हिने याप्रकरणात तक्रार दिली. तक्रारीत तिने म्‍हटले आहे, की २७ डिसेंबर २०२० रोजी तिचे लग्न जळगाव खानदेश येथील सुनील भिवाजी पवार याच्यासोबत झाले होते. २९ नोव्हेंबर रोजी सुनील दीपालीला पाहण्यासाठी आला होता तेव्हा महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालयात क्लर्क असल्याचे त्याने सांगितले. मुलगा नोकरीला असल्याने घरच्यांनी विश्वास ठेवला. त्याच्या मागणीप्रमाणे टिळ्याच्या व लग्नाच्‍या कार्यक्रमात भरपूर खर्च केला. नवरदेवाला अंगठी, गोफ व जावईभेट म्हणून रोख २ लाख रुपये देण्यात आले. लग्नानंतर केवळ सात ते आठच दिवस त्याने दीपालीला चांगले वागविले. नंतर सुनील विचित्रपणे वागत होता. तिला अश्लील शिविगाळ करत होता. दीपालीला माहेरच्यांशी व माहेरच्यांना दीपालीशी बोलता येत नव्हते. घरातील सासू, सासरे व इतर लोक सुनीलला दीपाली विरुद्ध भडकावत होते. तिला तुझ्या आवाक्यात ठेव, मोकाट सोडू नको, असे सासरची मंडळी म्हणत होती. प्लॉट घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून ३ लाख रुपये घेऊन ये असे म्हणत लग्नानंतर काहीच दिवसांत तिचा छळ होऊ लागला.

लग्नानंतर ३१ व्या दिवशी २८ जानेवारी २०२१ रोजी दीपाली घरात साफसफाई करत होती. त्यावेळी तिला घरातील कपाटात लग्नाच्या पत्रिका सापडल्या. त्या पाहून दिपालीला धक्काच बसला. सुनीलचे या अगोदर दोन लग्न झाल्याचे तिला कळाले. तिने याबद्दल सुनीलला विचारणा केली असता सुनील म्हणाला, की “मी तीन लग्न केलेले आहे. माझ्यासोबत एकही मुलगी संसारात टिकत नाही. आपले काम खूप खराब आहे’, असे म्हणत त्याने दीपालीला मारहाण सुरू केली. सुनीलने अमानुषपणे मारहाण केली व संभोग करून यौनशोषण केले, असे दीपालीने तक्रारीत म्हटले आहे. दीपालीने फोन करून याबद्दलची माहिती दिली. वडिलांना जळगावला बोलावून घेतले. त्यांच्यासोबत ती माहेरी आली. तेव्हापासून ती सध्या माहेरी खामगावला राहत आहे. तक्रारीवरून तिचा पती सुनील पवार, दीर कैलास पवार, दिरानी दीपाली कैलास पवार, दीर प्रकाश पवार, गजानन भिवाजी पवार (सर्व रा. जळगाव खानदेश), लग्नाचा मध्यस्थी सुखदेव मोरे, राजू मोरे व कांताबाई कांबळे, आकाश कांबळे (रा. जोगेश्वरी, मेहकर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.