लग्‍नात 1000 रुपये आहेर केला म्हणून पत्‍नीला बेदम मारहाण; मोताळा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्नीने मामेभावाच्या लग्नात 1हजार रुपयांचा केलेला आहेर पतीला खटकला. त्याने यावरून पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिने बोराखेडी पोलीस ठाणे गाठत नवऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. तरोडा (ता. मोताळा) येथे काल, 22 एप्रिलला सायंकाळी ही घटना घडली. सुरेखा जयसिंग भेलके (रा. तरोडा) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. पती जयसिंग शिवसिंग भेलके …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पत्‍नीने मामेभावाच्‍या लग्‍नात 1हजार रुपयांचा केलेला आहेर पतीला खटकला. त्याने यावरून पत्‍नीला बेदम मारहाण केली. त्‍यामुळे तिने बोराखेडी पोलीस ठाणे गाठत नवऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. तरोडा (ता. मोताळा) येथे काल, 22 एप्रिलला सायंकाळी ही घटना घडली. सुरेखा जयसिंग भेलके (रा. तरोडा) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. पती जयसिंग शिवसिंग भेलके (44) याच्याविरोधात  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.