लग्‍नानंतर कळले, अरेच्चा बायको पसंतच नाही!

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तू पसंत नाही असे म्हणून विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सावखेड भुई (ता. सिंदखेड राजा) येथे समोर आला आहे. सौ. अश्विनी सुनिल जाधव (रा. सावखेड भुई) या विवाहितेने पती सुनिल, सासू आशा पूंजाजी जाधव, सासरा पूंजाजी, दीर महेंद्र, संध्या …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तू पसंत नाही असे म्‍हणून विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. हा प्रकार सावखेड भुई (ता. सिंदखेड राजा) येथे समोर आला आहे. सौ. अश्विनी सुनिल जाधव (रा. सावखेड भुई) या विवाहितेने पती सुनिल, सासू आशा पूंजाजी जाधव, सासरा पूंजाजी, दीर महेंद्र, संध्या काकासाहेब चौथमल, मंदा संदीप आराख यांच्‍याविरुद्ध तक्रार दिली आहे. तू पसंत नाही म्‍हणून सुनील याने तिचा दारू पिऊन येत शिविगाळ करून मारहाण करायचा. सासरच्या इतर मंडळींनीही तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे.