लग्‍नाला गेले होते, परत येऊन पाहतात तर सारेच संपलेले…!; नांदुरा तालुक्यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नसमारंभासाठी गावात गेलेल्या शेतकऱ्याचे घर जळून खाक झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा येथे काल, 31 मार्चला दुपारी घडली. विद्युत तारेच्या घर्षणामुळे ठिणग्या उडून शेतकरी प्रल्हाद लक्ष्मण तायडे यांच्या घराला आग लागली. काही वेळात रौद्ररुप धारण करत अवघे घर कवेत घेतले. सुदैवाने यावेळी घरात कुणी नव्हते. आगीत …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍नसमारंभासाठी गावात गेलेल्या शेतकऱ्याचे घर जळून खाक झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा येथे काल, 31 मार्चला दुपारी घडली.

विद्युत तारेच्‍या घर्षणामुळे ठिणग्या उडून शेतकरी प्रल्हाद लक्ष्मण तायडे यांच्या घराला आग लागली. काही वेळात रौद्ररुप धारण करत अवघे घर कवेत घेतले. सुदैवाने यावेळी घरात कुणी नव्‍हते. आगीत घरातील ज्वारीचे पोते, गव्हाचे पोते, डाळ दाना व इतर संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. त्यांनी सोयाबीन, तूर विकून घरात ठेवलेले पैसेसुध्दा जळून गेले आहेत. या पैशातून ते प्लॉटची खरेदी करणार होते. शेतकऱ्याच्या घरात  लागलेल्या आगीची व नुकसानाची पाहणी करून शासनाकडून मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.