लग्‍न झाले, देवदर्शन झाले अन्‌ चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल!; मोताळा तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना धोनखेड (ता. मोताळा) येथे आज, २४ जुलैला सकाळी घडली. सागर भीमराव अहिरे (२७, रा. धोनखेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागरचे चार दिवसांपूर्वीच शेंबा (ता. नांदुरा) येथील मुलीशी लग्न झाले होते. काल सागर आणि त्याची पत्नी देवदर्शन करून …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना धोनखेड (ता. मोताळा) येथे आज, २४ जुलैला सकाळी घडली.

सागर भीमराव अहिरे (२७, रा. धोनखेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागरचे चार दिवसांपूर्वीच शेंबा (ता. नांदुरा) येथील मुलीशी लग्न झाले होते. काल सागर आणि त्याची पत्नी देवदर्शन करून आले होते. आज सकाळी सागर झोपेतून उठून शौचास गेला. त्यावेळी शेतातील विहिरीवरच त्याने विषारी औषध प्राशन केले. वडिलांनी शोधाशोध केला असता तो विहिरीवर बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागरने आत्महत्या का केली या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.धामणगाव बढे पोलीस पुढील तपास करीत आहेत.