लग्‍न ठरले, साखरपुडा झाला, पत्रिका छापल्या अन्‌ ‘त्‍या’ कारणाने मोडले लग्न!; बुलडाण्यातील धक्‍कादायक प्रकार

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्न ठरले, साखरपुडाही आनंदात झाला, पत्रिकाही छापल्या गेल्या. 15 दिवसांवर लग्न आले असता मात्र अचानक नवरदेवाकडील मंडळींनी फोन करून लग्नास तयार नसल्याचे सांगितले. त्याला कारणही वेगळेच आहे. हे ऐकून मुलीच्या आई- वडिलांना चांगलाच धक्काच बसला. त्यांनी काल, 30 मार्चला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  लग्‍न ठरले, साखरपुडाही आनंदात झाला, पत्रिकाही छापल्या गेल्या. 15 दिवसांवर लग्‍न आले असता मात्र अचानक नवरदेवाकडील मंडळींनी फोन करून लग्‍नास तयार नसल्याचे सांगितले. त्‍याला कारणही वेगळेच आहे. हे ऐकून मुलीच्या आई- वडिलांना चांगलाच धक्काच बसला. त्यांनी काल, 30 मार्चला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई- वडील व भावाविरुद्ध रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बुलडाणा शहरातील सावित्रीबाई नगरात राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीचे लग्न सूर्यकांत मधुकर आराख (रा. सिडको एन 7, औरंगाबाद) याच्याशी ठरले होते. 24 डिसेंबर 2020 रोजी दोघांचा साखरपुडा होऊन 5 मार्च 2021 रोजी लग्न करण्याचे ठरले होते. दरम्यान साखरपुड्यातही वधूपित्याने मोठा खर्च केला होता. लग्‍नाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. दरम्यान 31 जानेवारी 2021 रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक होऊन 18 फेब्रुवारी रोजी जामिनावर सुटका झाली होती. या घटनेचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. 18 फेब्रुवारी रोजी नवरदेवाच्या घरच्यांनी मुलीला फोन करून सांगितले की तुझ्या वडिलांनी खून केला आहे. बातमी पेपरला आली आहे. त्यामुळे आता तुझ्याशी लग्न करणार नाही. यावर मुलीने नवरदेवाला फोन केला असता त्यानेही तेच उत्तर दिल्याने मुलीसह तिच्‍या आई- वडिलांना प्रचंड धक्का बसला. साखरपुड्याच्या कार्यक्रमात दीड ते दोन लाख रुपये खर्च झाल्याचे मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव सूर्यकांत मधुकर आराख, त्याची आई आशाबाई मधुकर आराख, वडील मधुकर नामदेव आराख व नवरदेवाचा भाऊ श्रीकांत मधुकर आराख (सर्व रा. सिडको एन 7 औरंगाबाद) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.