लघुशंका गेलेला नवरा हरवला!; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात काम करत असताना लघुशंका करायला गेलेला नवरा परतलाच नसल्याने विवाहितेने नवरा हरविल्याची तक्रार आज, ५ ऑक्टोबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात दिली. वर्षा समाधान म्हस्के (३०, रा. भरोसा, ता. चिखली) यांनी तक्रार दिली की, २ ऑक्टोबर रोजी त्या पती समाधान सुभाष म्हस्के यांच्यासह शेतात काम करीत होत्या. दुपारी २ वाजेच्या …
 
लघुशंका गेलेला नवरा हरवला!; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात काम करत असताना लघुशंका करायला गेलेला नवरा परतलाच नसल्याने विवाहितेने नवरा हरविल्याची तक्रार आज, ५ ऑक्टोबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात दिली.

वर्षा समाधान म्हस्के (३०, रा. भरोसा, ता. चिखली) यांनी तक्रार दिली की, २ ऑक्टोबर रोजी त्या पती समाधान सुभाष म्हस्के यांच्यासह शेतात काम करीत होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास लघवीला जातो असे म्हणत समाधान म्हस्के बाजूच्या शेतात गेले. बराच वेळ होऊनही न परतल्याने त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने सर्वत्र घेतला. मात्र आजपर्यंत ते मिळून न आल्याने पत्नीने नवरा हरवल्याची तक्रार दिली. तपास पोहेकाँ कैलास उगले करीत आहेत.