लहान मुलांच्‍या भांडणावरून मोठ्यांत चालल्या तलवारी!; राष्ट्रवादीचा नेताही जखमी!; खामगाव तालुक्‍यातील घटना; 18 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा/खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लहान मुलांच्या भांडणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. यात 2 जण जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, धनंजय पुंडलिक टिकार (पाटील) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना काल, 17 मार्च रोजी बोरी आडगाव (ता. खामगाव ) येथे सायंकाळी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून 18 जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा …
 

बुलडाणा/खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लहान मुलांच्या भांडणावरून दोन गटांत सशस्‍त्र हाणामारी झाली. यात 2 जण जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, धनंजय पुंडलिक टिकार (पाटील) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना काल, 17 मार्च रोजी बोरी आडगाव (ता. खामगाव ) येथे सायंकाळी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून 18 जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीराव ऊर्फ रावसाहेब पाटील (रा. बोरी आडगाव, ता. खामगाव) यांच्या तक्रारीनुसार धनंजय पुंडलिक पाटील (40), प्रकाश विठ्ठल पाटील (60), अशोक विठ्ठल पाटील (40), चेतन रामराव पाटील (36), सुहास विठ्ठल पाटील (57), प्रमोद पुंडलिक पाटील (40), सागर भरत पाटील (34), सुजित भारत पाटील (30), अर्पित अशोक पाटील (19), सदानंद भारत पाटील (25), नितीन सुदाम पाटील (38), भरत पांडुरंग पाटील (68), आनंद भरत पाटील (36), अरुण विठ्ठल पाटील (60), अतुल अरुण पाटील (36), प्रतीक अरुण पाटील (28, सर्व रा. बोरी आडगाव, ता. खामगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून या मंडळींनी त्‍यांचा मुलगा ज्ञानेश्वरवर लाठी काठी, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला चढवला व गंभीर जखमी केले. रावसाहेब पाटील यांच्या पत्नीलाही लोटपोट करून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. रावसाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, तेही घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत.

दुसऱ्या गटातील तक्रारदार प्रमोद पुंडलिक टिकार यांनी तक्रार दिली, की रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर पाटील यांनी लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून टिकार यांच्या भावाच्या घरात घुसून भावाला लोखंडी रॉडने मारहाण केली व त्यांच्या भावाच्या पत्नीलाही लोटपोट करत जीवे मारण्याची धमकी दिली. टिकार यांच्या तक्रारीवरून शिवाजीराव रावसाहेब पाटील व ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.