लाटेपूर्वीच पारा 40 डिग्रीवर! हजारो बुलडाणेकर झाले हैराण परेशान!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपूर हवामान केंद्राने उद्या, 7 एप्रिल रोजी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली असताना आज, 6 एप्रिललाच बुलडाणा शहरातील तापमापकाचा पारा 40 डिग्री सेल्सिअसवर गेला! यामुळे हजारो बुलडाणेकर वाढत्या तापमानाने त्रस्त झाल्याचे व रस्ते दुपारी सुनसान पडल्याचे दिसून आले. हवामान खात्याने बुलडाणा जिल्ह्यात उद्या 7 एप्रिल रोजी उष्णतेच्या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नागपूर हवामान केंद्राने उद्या, 7 एप्रिल रोजी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली असताना आज, 6 एप्रिललाच बुलडाणा शहरातील तापमापकाचा पारा 40 डिग्री सेल्सिअसवर गेला! यामुळे हजारो बुलडाणेकर वाढत्या तापमानाने त्रस्त झाल्याचे व रस्ते दुपारी सुनसान पडल्याचे दिसून आले.

हवामान खात्याने बुलडाणा जिल्ह्यात उद्या 7 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. यामुळे सौम्य हवामानाची अथवा नियंत्रित तापमानाची सवय असलेले हजारो शहरवासी धास्तावले असतानाच आजचे तापमान 40 डिग्रीपर्यंत गेले. यापूर्वी 30 मार्च रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वधिक म्हणजे 41 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. यानंतर तापमान 39 डिग्रीच्या आसपास रेंगाळत राहिले! 31 मार्चला 39 डिग्री, 1 तारखेला 38.2 एप्रिलला 38.5 डिग्री, 3  व 4 तारखेला 39 डिग्री तापमानाची नोंद झाली. 5 एप्रिलला यात 39.5 डिग्री अशी किंचित वाढ होऊन आज 6 एप्रिलला त्याने 40 डिग्रीचा आकडा गाठलाय! आता उद्या लाटेत पारा कुठपर्यंत पोहोचतो याबद्दल शहरवासियांत भीतीयुक्त उत्सुकता निर्माण झाली आहे.