लॉकडाऊनचा नियम मोडला म्हणून काढलेल्या ३०० उठाबशांनी घेतला जीव

मनिला : कोरोनाची दहशत जगभरात पसरली आहे. अनेक देशांत लॉकडाऊन सुरू असून त्याचे कडक पालन केले जात आहे. कोरोनाचे नियम मोडणार्यांना पोलीस कठोर शिक्षादेखील करत आहेत.परंतु अशीच शिक्षा एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. फिलिपाइन्समध्ये मनिला येथे स्थानिक पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडले म्हणून काही लोकांना पकडले होते. त्यांना शिक्षा म्हणून १०० उठाबशा काढण्यास सांगितले जात होते. …
 

मनिला : कोरोनाची दहशत जगभरात पसरली आहे. अनेक देशांत लॉकडाऊन सुरू असून त्याचे कडक पालन केले जात आहे. कोरोनाचे नियम मोडणार्‍यांना पोलीस कठोर शिक्षादेखील करत आहेत.परंतु अशीच शिक्षा एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. फिलिपाइन्समध्ये मनिला येथे स्थानिक पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडले म्हणून काही लोकांना पकडले होते. त्यांना शिक्षा म्हणून १०० उठाबशा काढण्यास सांगितले जात होते. पोलिसांनी डेरेन नावाच्या एका तरुणालाही पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यालाही शंभर उठाबशा काढण्याचे फर्मान पोलिसांनी सोडले. त्याप्रमाणे डेरेने शंभर उठाबशा काढल्यादेखील. पण त्या काढताना तुझी लय आणि वेग इतरांशी मॅच होत नाही म्हणून पोलिसांनी त्याला पुन्हा तितक्याच उठाबशा काढायला लावल्या. असा प्रकार तीनवेळा घडला व डेरेनला एकूण ३०० उठाबशा काढाव्या लागल्या.इतक्या उठाबशा काढल्याने तो पुरता गळपटून गेला होता. घरी आला तेव्हा त्याचे पाय खूप दुखायला लागले. त्याला हृदयविकाराचा आजार होता.३०० उठाबशा व पोलिसांनी दिलेला तणाव यामुळे त्याची तब्येत बिघडली व त्यात त्याचा मृत्यू झाला, असे त्याच्या पत्नीने सांगितले. ही घटना व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांविषयी लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. डेरेनच्या बहिणीनेही या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.