लॉकडाऊन रद्द करा; नाहीतर जेलमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था करा, भाजपने दिला सोमवारपर्यंतचा अल्टीमेटम

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने लागू केलेला लॉकडाऊनचा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. सामान्य लोक या निर्णयामुळे हवालदिल झाले आहेत. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकतर लॉकडाऊनचा आदेश रद्द करा किंवा लोकांना जेलमध्ये टाकून त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज, 7 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांना भेटून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने लागू केलेला लॉकडाऊनचा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. सामान्य लोक या निर्णयामुळे हवालदिल झाले आहेत. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकतर लॉकडाऊनचा आदेश रद्द करा किंवा लोकांना जेलमध्ये टाकून त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज, 7 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली आहे.

सोमवारपर्यंत या निर्णयाचा फेरविचार केला नाही तर सोमवारपासून व्यापारी व व्यावसायिकांना सोबत घेऊन भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी निवेदनातून देण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अशोक गोकुल शर्मा, नगरसेवक अरविंद होंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.