लॉक डाऊनच्या आदेशाचा विस्तार, सुधारित आदेश जारी, कृषी केंद्रांना दिलासा, खासगी आरोग्य सेवांना निर्देश

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच शहराना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. सोमवारी दुपारी निघालेल्या आदेशात रात्री उशिरा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी काही आवश्यक बदल केले आहे. यानुसार हॉटेल, उपहारगृहे यांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडे ठेवता येईल. पण …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच शहराना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. सोमवारी दुपारी निघालेल्या आदेशात रात्री उशिरा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी काही आवश्यक बदल केले आहे.

यानुसार हॉटेल, उपहारगृहे यांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडे ठेवता येईल. पण केवळ घरपोच सुविधा देता येणार आहे. खासगी, वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सक सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहतील. रुग्णालय नियमित वेळेत सुरू राहणार असून रुग्णांना सेवा नाकारता येणार नाही. मेडिकल स्टोअर्स, ॲबुलन्स सेवा 24 तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस एजन्सी सुरू राहील. पूर्वनियोजित परीक्षा वेळेनुसार होतील. चिकन, मांस, अंडी विक्रीची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सुरू राहण्याची मुभा देण्यात आली आहे. कृषी सेवा केंद्र, कृषी प्रक्रिया उद्योगासाठी मूळ आदेशात स्पष्टता नव्हती. आता त्यांना सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान अशी वेळ देण्यात आहे.