लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय!; चार तरुणींची सुटका

कल्याण ः पुण्याला जसे सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते तसेच डोंबिवलीलाही मुंबई परिसराची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या या शहरात आता अवैध धंद्याचे पेव फुटले आहे. ठाण्याच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी डोंबिवली पूर्वच्या एका लाॅजवर छापा टाकून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. ठाण्याच्या अँटी ह्यमुन ट्रॅफिक सेलनं लाॅजवर छापा टाकला. …
 

कल्याण ः पुण्याला जसे सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते तसेच डोंबिवलीलाही मुंबई परिसराची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या या शहरात आता अवैध धंद्याचे पेव फुटले आहे. ठाण्याच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी डोंबिवली पूर्वच्या एका लाॅजवर छापा टाकून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

ठाण्याच्या अँटी ह्यमुन ट्रॅफिक सेलनं लाॅजवर छापा टाकला. त्या वेळी तिथे चार तरुणींकडून वेशा व्यवसाय करून घेतला जात असल्याचं उघडकीस आलं. या पथकाने चार तरुणींची सुटका केली. लॉजच्या व्यवस्थापकांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. डोंबिवली पूर्वेला जिमखाना रोडला बालाजी दर्शन नावाची इमारत आहे. या इमारतीसमोर असलेल्या साईराज लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालविले जात होते. त्याची माहिती ठाण्याच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या पथकाने छापा टाकला.

या लाॅजवर बऱ्याच दिवसांपासून भागात देहव्यापार सुरू होता. पोलिसांनी अगोदर बोगस ग्राहक पाठविले. खात्री झाल्यानंतर छापा टाकला. लॉजचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. ज्या चार तरुणींना अटक करण्यात आली, त्यांची रवानगी महिला सुधार केंद्रात करण्यात आली आहे. या भागात खुलेआम देहव्यापार सुरू असताना स्थानिक पोलिस काय करीत होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.