लोखंडकार x लोखंडकार धुमश्‍चक्री! महिला, मुलांसह सारेच एकमेकांवर तुटून पडले!; 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटांत तुुंबळ हाणामारी झाली. यात 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना आवार (ता. खामगाव) येथे 1 फेब्रुवारीला सकाळी घडली. या प्रकरणी आज परस्पविरोधी तक्रारी देण्यात आल्याने खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटांतील महिला-पुरुषांसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हाणामारीत लाठ्या, काठ्या, कुर्हाड, दगडांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटांत तुुंबळ हाणामारी झाली. यात 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना आवार (ता. खामगाव) येथे 1 फेब्रुवारीला सकाळी घडली. या प्रकरणी आज परस्पविरोधी तक्रारी देण्यात आल्याने खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटांतील महिला-पुरुषांसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हाणामारीत लाठ्या, काठ्या, कुर्‍हाड, दगडांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की पहिल्या गटातील मोहन परशमराम लोखंडकार (31) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेंद्र सोनाजी लोखंडकार, समाधान सोनाजी लोखंडकार, विठ्ठल पुंडलिक लोखंडकार, सोनाजी पुंडलिक लोखंडकार, केसरबाई विठ्ठल लोखंडकार, ज्योती राजेंद्र लोखंडकार, सुरेखा समाधान लोखंडकार, दीपक समाधान लोखंडकार, अभिषेक राजेंद्र लोखंडकार, वैष्णवी राजेंद्र लोखंडकार (सर्व रा. आवार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या गटातील समाधान लोखंडकार (45) यांच्या तक्रारीवरून मोहन परशराम लोखंडकार, गोपाल परशराम लोखंडकार, गजानन परशराम लोखंडकार, शांताराम परशराम लोखंडकार, ज्ञानेश्‍वर गजानन लोखंडकार, अनिता गोपाल लोखंडकार, परशराम मोतीराम लोखंडकार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक भगवान राठोड करत आहेत.