लोणारच्‍या तीन शेतकऱ्यांसह एका शिक्षकावर काळाचा घाला!; बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून कोसळून कार पाण्यात बुडाली

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःनिर्माणाधीन पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात कार कोसळली. यात 3 शेतकऱ्यांसह एका शिक्षकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना परभणी जिल्ह्यातील सेनगाव- येलदरी रस्त्यावरील सेनगावजवळ काल, 13 जूनला मध्यरात्री घडली. अपघातात ठार झालेले चौघेही लोणार तालुक्यातील रहिवासी होते. शिक्षक गजानन सानप (रा. खळेगाव), शेतकरी त्र्यंबक थोरवे (रा. पळसखेड), प्रकाश सोनुने (रा. वढव) व …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःनिर्माणाधीन पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात कार कोसळली. यात 3 शेतकऱ्यांसह एका शिक्षकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना परभणी जिल्ह्यातील सेनगाव- येलदरी रस्‍त्‍यावरील सेनगावजवळ काल, 13 जूनला मध्यरात्री घडली. अपघातात ठार झालेले चौघेही लोणार तालुक्यातील रहिवासी होते.

शिक्षक गजानन सानप (रा. खळेगाव), शेतकरी त्र्यंबक थोरवे (रा. पळसखेड), प्रकाश सोनुने (रा. वढव) व विजय परसराम ठाकरे (रा. धानोरा) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. चौघांच्‍या मुली नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करत आहेत. त्‍यांच्‍या क्‍लासेसची फी भरण्यासाठी चौघे नांदेडला गेले होते. परतताना मध्यरात्री ही दुर्घटना घडली. सानप हे ओझर आघाव (ता. लोणार) येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.

नांदेडवरून लोणारकडे परतताना सेनगावजवळ त्यांची कार बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्‍या खड्ड्यात पडली. खड्ड्यात पावसामुळे पाणी साचलेले होते. त्‍यात कार बुडाली. चौघांचाही गुदमरून मृत्यू झाला. गाडीचा एक लाईट सुरू असल्याने ही बाब रस्त्यावर येजा करणाऱ्यांच्या निदर्शनास आली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.