लोणारमध्ये आग लागून बैलाचा चारा खाक

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः लोणार शहरातील आझादनगर येथील शेख मिस्कील शेख मुस्लिम यांच्या घराजवळ असलेल्या शेतात बैलाच्या चाऱ्याच्या गंजीला आज, 31 मार्चला अचानक आग लागली. लोणार नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल आली आणि आग विझवण्यात आली. अंदाजे 50 हजारांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. घटनास्थळीअशोक मदनगर …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः लोणार शहरातील आझादनगर येथील शेख मिस्कील शेख मुस्लिम यांच्या घराजवळ असलेल्या शेतात बैलाच्या चाऱ्याच्या गंजीला आज, 31 मार्चला अचानक आग लागली. लोणार नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल आली आणि आग विझवण्यात आली. अंदाजे 50 हजारांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. घटनास्थळीअशोक मदनगर ,प्रभू सानप, शेख सलीम, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, आबेद खान, राजेश मापारी, समाधान मापारी, तानाजी मापारी, संतोष जाधव, राऊत, प्रभारी आरोग्य निरीक्षक अशोक निचंग उपस्थित होते.