लोणारमध्ये आढळला कुजलेला लटकता मृतदेह!; घातपात की आत्‍महत्‍या?

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार येथील दुर्गाटेकडी परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आज, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणी बायपास रोडवरील दुर्गा टेकडी परिसरातील गिरसडीच्या जंगलात पुरुषाचा मृतदेह लटकलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप ठाकूर …
 
लोणारमध्ये आढळला कुजलेला लटकता मृतदेह!; घातपात की आत्‍महत्‍या?

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार येथील दुर्गाटेकडी परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आज, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्‍या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोणी बायपास रोडवरील दुर्गा टेकडी परिसरातील गिरसडीच्या जंगलात पुरुषाचा मृतदेह लटकलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो नेमका कुणाचा आहे याची माहिती रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही. ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास लोणार पोलीस स्टेशनचे पोहेकाँ चंद्रशेखर मुरडकर, संतोष चव्हाण करीत आहेत.