लोणारमध्ये दूषित पाण्याच्‍या समस्‍येने नागरिक हैराण, नळातून येतेय घाण पाणी!

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दुसरीकडे घाण पाण्यानेही नागरिक आजारी पडण्याची शक्यता लोणार शहरात निर्माण झाली आहे. काही भागांत घाणेरडे पाणी नळाला येत आहे. याकडे नगरपालिकेचे दूर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. शुद्ध पाणी मिळेल म्हणून नळ जोडणी घेतली. पाणी गढूळ असते, त्यात घाण असते. त्यामुळे पिण्यासाठी पाणी …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  कोरोना रुग्‍णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दुसरीकडे घाण पाण्यानेही नागरिक आजारी पडण्याची शक्‍यता लोणार शहरात निर्माण झाली आहे. काही भागांत घाणेरडे पाणी नळाला येत आहे. याकडे नगरपालिकेचे दूर्लक्ष होत असल्याच्‍या तक्रारी नागरिक करत आहेत.

शुद्ध पाणी मिळेल म्हणून नळ जोडणी घेतली. पाणी गढूळ असते, त्‍यात घाण असते. त्‍यामुळे पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. नगरपालिका नागरिकांना पाणी पाजते की विष?

– वाजद भाई, रहिवासी

पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. असे दिसते की टाकी कधीही साफ केली जात नाही. लाखो रुपये खर्चून फिल्‍टर प्लांट उभारण्यात आला. तो सुरू आहे की नाही? असेल तर योग्यप्रकारे पाणी फिल्‍टर केले जाते की नाही? पाणीपुरवठा विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.

– गजानन मापारी, शहराध्यक्ष, भाजपा

घाणेरडे पाणी पिण्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार उद्‌भवू शकतात. डायरिया, न्यूमोनिया, मेंदूज्वर, अर्धांगवायू होण्याची शक्यता वाढते. घरी पाणी पिण्यापूर्वी ते गरम करून आणि फिल्टरिंग करूनच नंतरच वापरावे.

– डॉक्टर गजानन सोसे