लोणारमध्ये नवीन जलवाहिनी मंजुरीसाठी नगराध्यक्षांची धडपड!; मंत्री यशोमती ठाकूर यांना घातले साकडे!

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा येथे लक्ष्मणराव घुमरे यांच्या घरी महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी 23 जानेवारीला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत लक्ष्मणराव घुमरे, रमेश घुमरे, नितीन घुमरे, सौ. वसुधाताई घुमरे यांनी केले. लोणार शहरातील जुनी जलवाहिनी बदलून नवीन टाकण्यास मंजुरी मिळावी, असे निवेदन यावेळी लोणारच्या नगराध्यक्षा पूनमताई पाटोळे …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा येथे लक्ष्मणराव घुमरे यांच्या घरी महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी 23 जानेवारीला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत लक्ष्मणराव घुमरे, रमेश घुमरे, नितीन घुमरे, सौ. वसुधाताई घुमरे यांनी केले. लोणार शहरातील जुनी जलवाहिनी बदलून नवीन टाकण्यास मंजुरी मिळावी, असे निवेदन यावेळी लोणारच्या नगराध्यक्षा पूनमताई पाटोळे यांनी मंत्री श्रीमती ठाकूर यांना दिले.
लोणार शहराला देऊळगाव कुंडपाळ येथून होत असलेल्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन बदलणे, बुडित क्षेत्रात जॉकवेल घेणे, बीचींग आरसीसी पंप मशीन बसविणे, जलवाहिनी 1400 मीटर ही अभयारण्यातून जात असल्यामुळे वन विभागाची परवानगी मिळणे अशा अनेक बाबी त्यांच्यासमोर नगराध्यक्षांनी मांडल्या. यावेळी त्यांच्यासोबत विजय अंभोरे (प्रदेशाध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग) राहुल बोंद्रे (जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार), सौ. मनीषाताई पवार (अध्यक्षा जिल्हा परिषद), हर्षवर्धन सपकाळ (माजी आमदार) सौ. मिनलताई आंबेकर (प्रदेश उपाध्यक्षा महिला काँग्रेस), सौ. स्वातीताई वाकेकर (पक्षनेत्या जळगाव जामोद), सौ. ज्योतीताई पडघान (सभापती जि. प.), कासमभाई गवळी (नगराध्यक्ष मेहकर) प्रकाश पाटील (माजी अध्यक्ष जि. प.), नंदकुमार बोरे, सुनील सपकाळ, वसंतराव देशमुख, देवानंद पवार, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अशोक खेडेकर, गणेश बोचरे, अशोकभय्या जैस्वाल, शैलेश खेडकर, सौ. आशाताई इंगळे, साहेबराव पाटोळे, प्रकाश देशमुख, अविनाश उबरकर, बाळासाहेब वानेरे, तुळशीराम नाईक, पवन जाधव, संतोष खरात आदी पदाधिकारी हजर होते.