लोणारमध्ये भरला होता जुगाऱ्यांचा मेळा!; 32 बडे मासे गळाला, तब्‍बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणारच्या लौकिकाला अवैध धंद्यांनी पार काळीमा फासला आहे. अवैध दारू विक्री, जुगाराच्या धंद्याच्या तक्रारी वाढत असताना पोलीस अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप होतात. मात्र या आरोपांत तथ्य असल्याचे काल, 24 मे रोजी समोर आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरील बंगल्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे शहर म्‍हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणारच्‍या लौकिकाला अवैध धंद्यांनी पार काळीमा फासला आहे. अवैध दारू विक्री, जुगाराच्‍या धंद्याच्‍या तक्रारी वाढत असताना पोलीस अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप होतात. मात्र या आरोपांत तथ्य असल्याचे काल, 24 मे रोजी समोर आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्‍या निवासस्‍थानापासून हाकेच्‍या अंतरावरील बंगल्यात जिल्ह्यातीलच नव्‍हे तर परजिल्ह्यातील जुगाऱ्यांचा मेळा भरला होता. काल, 24 मेच्‍या सायंकाळी या ठिकाणी छापा मारून बुलडाणा स्‍थानिक शाखेने तब्‍बल 32 जुगाऱ्यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या आहेत, एक जण फरारी होण्यात यशस्वी झाला. तब्‍बल 28 लाख 84 हजार 549 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  रात्री उशिरा याप्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील बहुतांश जुगारी सत्तेतील राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या तीन मजली इमारतीत हा जुगार अड्डा चालवला जात होता.

लोणार येथील  प्रतिष्ठित (!) समजले जाणारे राजू माधवराव मापारी यांच्या राहत्या घरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेला (एलसीबी) मिळाली होती. त्यावरून एलसीबीने काल सायंकाळी 5 च्या सुमारास छापा मारला. यावेळी तीन खोल्यांमध्ये 32 जुगारी रंगेहात जुगार खेळताना पकडण्यात आले. घटनास्थळावरून पत्त्याचे कॅट, 2 लाख 45 हजार दोनशे पंचवीस रुपये रोख, पंचवीस मोबाईल फोन (किंमत 2 लाख 69 हजार दोनशे रुपये), चार चाकी वाहन किंमत 20 लाख रुपये असा एकूण 28 लाख 84 हजार 579 रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे आहेत आरोपी

संतोष मदनलाल लद्धड (49, रा. हिवरा आश्रम, ता. मेहकर), अनिल अण्णाभाऊ इंगळे (30, रा. शिक्षक कॉलनी मेहकर), सुधीर सुदाम गवई (41, रा. गजानननगर चिखली), एकनाथ रामचंद्र गायकवाड (36, रा. ब्राह्मण चिकना ता. लोणार), सुनील जयराम सूर्जन (42, रा. संतोषीमातानगर मेहकर), शेख सखावत शेख शफा (43, रा. नवी नगरी लोणार), सेट मिस्कीन शेख मुस्लिम (40, रा. कुरेशी मोहल्ला लोणार), फारुख खाँ रेबर खाँ पठाण (30, रा. बर्डे प्लॉट, खामगाव), जितेंद्र नामदेव राऊत (32, रा. भीम ज्योतीनगर चिखली), दत्तात्रय धोंडीराम मोगल (60, रा. सेलू जिल्हा परभणी), अब्दुल अनिस अब्दुल मजीद (35, रा. गवळीपुरा मेहकर), शरद एकनाथ भानापुरे (35, रा. सुलतानपूर, ता. लोणार), शेख राजू शेख अब्दुल्ला (50, रा. बर्डे प्लॉट, खामगाव), शांताराम तेजराव जाधव  (35, रा. भिवगाव ता. देऊळगाव राजा), इम्रान खान मोमीन खान (40, रा. लोणार), विलास नारायण मस्के (33, रा. सोनोशी पोस्ट किनगाव राजा), अलियार खान बशारत खान (34, रा नवीनगरी लोणार), राजेंद्र गुलाबचंद जैन  (55, रा. गांधीनगर चिखली), भगवान किसन आगाव (54,  रा. सोनोशी), सागर श्रावण अंभोरे (29, रा वॉर्ड नंबर 1, नांदुरा), संतोष बाबुराव डोईफोडे (45, रा. सिनगाव जहाँगीर, ता. देऊळगाव राजा), विश्वनाथ बबन कुंटला  (40, रा. अहमदनगर), असलम खान मोबीन खान (50, रा. धार चौक लोणार), रामेश्वर सखाराम मालवणकर (29, रा. लोणार), शेख तौफिक शेख हनीफ (30, रा. लोणार), विठ्ठल गंगाधरराव आकात (65, रा. सेलू जिल्हा परभणी), इम्रान खान शेरखान (30, रा. धार रोड लोणार), अब्दुल रफिक अब्दुल कादर (65, रा. बागवानपुरा चिखली), गजानन उत्तम वर्षे (40, रा. ब्रह्मपुरी ता. मेहकर),  ज्ञानेश्वर प्रकाश खानझोडे  (36, रा. शिवाजीनगर, नवा फैल खामगाव), रविराज केशव चव्हाण (34, रा. खडकेश्वरनगर, लोणार), सुनील दिलीप साळवे (28, रा. सिद्धार्थनगर चिखली) यांना ताब्‍यात घेण्यात आले असून, राजू माधवराव मापारी (रा. लोणार) फरारी झाला आहे.

यांनी केली कारवाई…

कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक मनीष गावंडे, पोहेकाँ सुधाकर काळे, राजू अंभोरे, नापोकाँ सुनील खरात, पोकाँ युवराज शिंदे, पोकाँ गणेश शेळके,  मपोकाँ अनुराधा उबरहंडे, पोकाँ आकाश यादव, हेकाँ सागर आनंदा गवळी, कोकाजे जाधव, संदीप मोदे यांनी पार पाडली.