लोणारमध्ये भीषण आग; तीन दुकाने भस्मसात; आग विझता विझेना….

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत भीषण आग लागून तीन दुकाने खाक झाली. ही घटना आज, 2 मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आग विझता विझत नव्हती. मेहकर, लोणार येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने प्रयत्नांची शर्थ करत, त्यांना मिळालेल्या नागरिकांच्या साथीने अखेर आग विझविण्यात पावणेआठच्या सुमारास यश आले. संध्याकाळी आग लागल्याने …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत भीषण आग लागून तीन दुकाने खाक झाली. ही घटना आज, 2 मार्चला सायंकाळी पाचच्‍या सुमारास घडली. आग विझता विझत नव्‍हती. मेहकर, लोणार येथील नगरपरिषदेच्‍या अग्‍निशामक दलाने प्रयत्‍नांची शर्थ करत, त्‍यांना मिळालेल्या नागरिकांच्‍या साथीने अखेर आग विझविण्यात पावणेआठच्‍या सुमारास यश आले. संध्याकाळी आग लागल्याने तीन दुकानांवर निभावले. हीच आग रात्री लागली असतील तर मोठा विनाश घडवून गेली असती. तिन्‍ही दुकाने खाक झाल्याने लाखाे रुपयांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज आहे.

लोणी रोडवरील नगरसेवक पती धरमचंद लुनिया यांची स्टेशनरी दुकान, शरद लुनिया यांची किराणा दुकान आणि अजिसपूर येथील एकाचे कापड दुकान आगीत भस्मसात झाले आहे. पाचच्या दरम्यान अचानक आग लागली. कुणालाही काही कळायच्‍या आतच आगीने रौद्ररुप धारत करत एकापाठोपाठ एक तीन दुकाने कवेत घेतली. आग एवढी भीषण होती की तीनही दुकाने जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण रात्री पावणेआठपर्यंत कळले नाही. आग विझविण्यासाठी गर्दी झाली होती. लोणार नगरपरिषदेच्‍या अग्‍निशामक दलाचा बंब, खासगी टँकर मागवून सुरुवातीला आग विझविण्याचे प्रयत्‍न झाले. मात्र हे प्रयत्‍न तोकडे पडत असल्याने मेहकरवरून आणखी एक बंब मागविण्यात आला. त्‍यानंतर नागरिकांच्‍या मदतीने दोन्‍ही दलांनी आगीवर नियंत्रण मिळवले.