लोणारमध्ये शासकीय गोदामाला आग!

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः लोणार येथील शासकीय गोडाऊनमध्ये आज, 12 मार्चला संध्याकाळी 5 च्या सुमारास आग लागली. मात्र तात्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला. गोदामातील ज्वारीच्या काही कट्ट्यांना सायंकाळी 5 वाजता आग लागल्याचे निदर्शनास आले. धूर येऊ लागल्याने वेळीच आग लक्षात येत तातडीने आग लागलेल्या कट्ट्यामधून ज्वारी खाली करण्यात आली. यामुळे धान्याचे किरकोळ नुकसान …
 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः लोणार येथील शासकीय गोडाऊनमध्ये आज, 12 मार्चला संध्याकाळी 5 च्या सुमारास  आग लागली. मात्र तात्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.

गोदामातील ज्वारीच्या काही कट्ट्यांना सायंकाळी 5 वाजता आग लागल्याचे निदर्शनास आले. धूर येऊ लागल्याने वेळीच आग लक्षात येत तातडीने आग लागलेल्या कट्ट्यामधून ज्वारी खाली करण्यात आली. यामुळे धान्याचे किरकोळ नुकसान झाले. सध्या गोडाऊन पूर्णतः सुरक्षित असून, आगीने प्रभावित कट्टे खाली करून बाहेर ठेवण्यात आले आहे. अंदाजे 1200 कट्टे तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्यामुळे मोठे नुकसान टाळण्यात यश आले. गोडाऊनशी संबंधित हमालांसोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व स्थानिक स्वयंसेवकांनी यासाठी सहकार्य केले.