लोणारला गेल्यावर ‘तिथे’ जाऊन म्‍हणा, आय लव्‍ह…

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः औरंगाबादनगरीत आय लव्ह औरंगाबादवरून राडा झाला, आता सुपर संभाजीनगरचे असे फलकवजा सेल्फी पॉईंट तिथे उभारण्यात आले आहेत. त्याच संकल्पनेच्या धर्तीवर लोणारमध्येही आता आय लव्ह लोणारचा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला असून, तिथे आज, 3 मार्चला स्वतः सेल्फी घेऊन अधिकारी, लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाचे लोकार्पण केले. सतत नवनवीन कल्पनांना मूर्त …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः औरंगाबादनगरीत आय लव्‍ह औरंगाबादवरून राडा झाला, आता सुपर संभाजीनगरचे असे फलकवजा सेल्‍फी पॉईंट तिथे उभारण्यात आले आहेत. त्‍याच संकल्‍पनेच्या धर्तीवर लोणारमध्येही आता आय लव्‍ह लोणारचा सेल्‍फी पॉईंट उभारण्यात आला असून, तिथे आज, 3 मार्चला स्‍वतः सेल्‍फी घेऊन अधिकारी, लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाचे लोकार्पण केले.

सतत नवनवीन कल्‍पनांना मूर्त रूप देऊन शहराच्‍या सौंदर्यीकरण आणि विकासात भर घालणाऱ्या मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी ही नवीन संकल्पना प्रत्‍यक्षात आणली आहे. शहरातील धार चौक परिसरात हा सेल्‍फी पॉईंट आहे. या वेळी उप विभागीय अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार सैफन नदाफ, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, न. प. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन शिंदे, उप नगराध्यक्ष बादशाह खान, साहेबराव  पाटोळे, नगरसेवक डॉ. अनिल मापारी, नगरसेवक संतोष पाटील, गजानन खरात, अशोक निचंग, संजय येनेवार, अन्वर शाह आदी उपस्‍थित होते.