लोणारवासियांनो, कोरोना टेस्‍ट अन्‌ लसीकरण करून घ्या; नगराध्यक्षा पूनम पाटोळे यांचे आवाहन

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार ग्रामीण रुग्णालयातर्फे शहरात ठिकठिकाणी शिबिरे घेऊन रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत. तसेच 60 वर्षांवरील नागरिक तसेच गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण ग्रामीण रुग्णालयात केले जात आहे. नागरिकांनी टेस्ट करून घ्याव्यात व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा पूनम पाटोळे यांनी केले आहे. नागरिकांनी …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणार ग्रामीण रुग्णालयातर्फे शहरात ठिकठिकाणी शिबिरे घेऊन रॅपिड टेस्‍ट केल्या जात आहेत. तसेच 60 वर्षांवरील नागरिक तसेच गंभीर आजार असलेल्‍या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण ग्रामीण रुग्‍णालयात केले जात आहे. नागरिकांनी टेस्‍ट करून घ्याव्यात व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा पूनम पाटोळे यांनी केले आहे.

नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. सुरक्षित अंतर ठेवावे. गर्दी करू नये. घराबाहेर पडताना मास्‍क लावावा, असे आवाहनही नगराध्यक्षांनी केले आहे. लोणारचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैफान नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी फिरोज शाह, लोणार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, लोणार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख कोरोनाला लोणार तालुक्‍यातून हद्दपार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असेही नगराध्यक्षा पूनम पाटोळे यांनी म्‍हटले आहे.